कुरकुंभ एमआयडीसीमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड

कुरकुंभ एमआयडीसी मध्ये स्थानिक तरुणांना रोजगार दिला जावा व परिसरात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच दौंड तालुक्यातील शेतकरी ,कामगार आणि नागरिकांच्या न्याय हक्का साठी कुरकुंभ एमआयडीसी कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कुरकुंभ कार्यालयाचे अधिकारी जोशी साहेब यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या संबधित विभागाकडे पोहचवून याची दखल घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले .मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख यांनी यावेळी इशारा दिला.

यावेळी प्रहारचे युवक अध्यक्ष राहुल दोरगे , उपाध्यक्ष रफिक सय्यद ,सरचिटणीस शैलेश शिपलकर,कामगार आघाडी अध्यक्ष प्रमोद शितोळे , प्रहार दिव्यांग संस्था पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप , राजेंद्र कदम विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुमीत निबाळकर उपस्थित होते .

तसेच पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पुनम तावरे , हवेली तालुकाध्यक्ष कामिनी ताकवले ,हवेली तालुका उपध्याक्ष पल्लवी ताई वेताळ , प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे दौंड तालुकाध्यक्ष बाळासाहेब नानवर तसेच प्रहार जन शक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि कामगार मोठया संख्येने या मोर्च्यात सामील झाले होते .
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यानी घोषणा देवून एमआयडीसी परीसर दुमदुमून सोडला होता .