चांडोली खुर्द येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली डोके आल्याने एकाचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द येथे ट्रॅक्टर हलगर्जीपणाने चालून विलास तेजू पोखरकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याप्रकरणी संगिता विलास पोखरकर यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास पोखरकर ( वय 55 मूळ रा.पिंपळगाव ता. आंबेगाव जि.पुणे सध्या रा. केरळ) हे सुमारे तीन दिवसांपूर्वी केरळ येथून पिंपळगाव खडकी येथे आले होते त्यांचे पाहुणे शिवाजी वामन इंदोरे यांना भेटण्यासाठी चांडोली खुर्द काठे मळा येथे त्यांच्या मोकळ्या शेतजमिनीवर गेले असता त्या ठिकाणी शिवाजी वामन इंदोरे यांचा भाऊ शहाजी वामन इंदोरे हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉली (एम एच 14 जे ए 9632)खडी भरून खडी मोकळे जमिनीमध्ये टाकून चालू ट्रॅक्टर वळवून घेत असताना विलास पोखरकर हे चालू ट्रॅक्टर वर उजव्या बाजूस बसत असताना त्याच्या हाताने एक्सलेटर दाबल्याने शहाजी यांचा चालू ट्रॅक्टर वरील ताबा सुटून तसा ट्रॅक्टर पुढे जाऊन विलास पोखरकर हे सदर ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूकडील मोठ्या चाकाखाली जाऊन त्यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर चे मोठे चाक व ट्रॉलीचे उजव्या बाजूचे मागील जाऊन अपघात होऊन विलास पोखरकर यांचा मृत्यू झाला आहे, याबाबत शिवाजी वामन केंद्रे यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली होती

Previous articleकॅरामेलाज केक कंपनी मधील कामगारांना बोनस म्हणून एलईडी टिव्ही संचचे वाटप
Next articleभोसे येथे जमीन मोजणीच्या वादातून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल