कॅरामेलाज केक कंपनी मधील कामगारांना बोनस म्हणून एलईडी टिव्ही संचचे वाटप

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांना फटका बसला असला तरी आय एस आर फूड्स कॅरामेलाज केक कंपनीने प्रथम मात्र कामगारांचे हित डोळयासमोर ठेवून त्यांना खंर प्रोत्साहन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शक्य तो भविष्यात सर्वानीच योग्य ती काळजी घेणे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या व परिसराच्या दूष्टीने अत्यंत आवश्यक आहे. उत्तम प्रकारे प्रशासन आपल काम करत असताना आपल्या कडून त्यांना योग्य सहकार्य लाभणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आय एस आर फूड्स कॅरामेलाज केक कंपनीचे प्रमुख राजेश कोतवाल यांनी केले.

दिपावलीच्या निमित्ताने आय एस आर फूड्स कॅरामेलाज केक कंपनी मधील कामगारांना बोनस म्हणून एलईडी टिव्ही संचचे वाटप करण्यात आले. कंपनीने सदैव सामाजिक दूरदृष्टीकोन ठेवून कार्य केले आहे. कोल्हापूर येथील पुरग्रस्थांसाठी निरपेक्षपणे मदत तसेच कोरोना महामारी मध्ये कामगारांना व सर्व सामान्य गोरगरिबांना किरणा मालाचे किट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कंपनीचे संचालक इंद्रजीत तुपे, समृद्धी तुपे – खोतकर आदी उपस्थित होते.