कहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबियांकडे अखेर शासकीय मदत सुपूर्द

राजगुरूनगर-चासकमान धरण  परिसरातील  कहू (ता.खेड) येथील भोराबाई बुधाजी पारधी (वय, ४३ )व नातू साहील दिनेश पारधी (वय ,वर्षे ४) हे दोघे आजी व नातू गेल्या महिन्यात (दि.२२) रोजी वेताळे गावातून आपल्या राहत्या घरी कहू येथे जात असताना अचानक आलेल्या वादळी पावसापासून बचाव करण्यासाठी मोरीत थांबल्या होत्या पण अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यामुळे नातवासह वाहून गेले होते.

या दुर्घटनेची तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दखल घेऊन सदर दुर्घटनेतील कुटूंबातील वारसांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी ४ लक्ष रुपये प्रमाणे एकूण ८ लक्ष रुपये मदत निधीचे धनादेश देण्यात दिले.या निधीचे धनादेश कामगार तलाठी माणिक क्षीरसागर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

यावेळी कृषी व पशुसंवर्धनचे मा.सभापती अरूणशेठ चांभारे, उपसरपंच अँड संतोष दाते, पोलिस पाटील अनिल दाते,अँड महेश तांबे,अरुण चांभारे,किशोर गिलबिले,लंन्कु वाढाणे उपस्थित होते.

Previous articleकहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबियांकडे अखेर शासकीय मदत सुपूर्द
Next articleवीरधवल बाबा जगदाळे यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती