सातकरस्थळात शेतामध्ये बिबट्याच्या बछड्याचा मृतदेह आढळला

राजगुरूनगर – खेड तालुक्यातील सातकरस्थळ येथे एका शेतामध्ये आज सकाळी बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे

आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सातकरस्थळ येथील एका शेतामध्ये बिबट्याचे नर जातीचे, सुमारे सहा ते आठ महिने वयाचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. अज्ञात प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हे पिल्लू मृत झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेऊन त्याचा पंचनामा केला.

परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका असल्याने वनखात्याने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावलेला आहे.

Previous articleहवेली पंचायत समितीच्या उपसभापती हेमलता बडेकर यांची निवड
Next articleकहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबियांकडे अखेर शासकीय मदत सुपूर्द