फुलांच्या पायघड्या व फुलांची उधळण करत कडूस येथील बोऱ्हाडे कुटूंबियांनी केले मुलीच्या जन्माचे स्वागत

प्रमोद दांगट-सध्या समाजात मूली नको, मूलगा हवा अशी स्थिती असताना, पहिली बेटी धनाची पेटी- असं न मानता मूलगी म्हणजे खर्चाला भार या विचाराने तिला नकोशी केले जाते आणि मुलीचा जन्म नाकारण्याची प्रवृत्ती समाजात पहावयास मिळते मात्र खेड तालुक्यातील कडूस येथील बोऱ्हाडे कुटुंबाने आपल्या मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत व फुलांचा वर्षाव करत केले आहे. या बोऱ्हाडे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कडूस (ता. खेड) येथील मयुरी व संदेश बोऱ्हाडे या दांपत्याला पहिलीच मुलगी झाली मयुरी बोऱ्हाडे यांना आपल्या माहेरी शिरदाळे येथे १८ सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते. त्यानंतर दीड महिन्यानंतर ते आपले सासरी कडूस येथे आले असता त्यांच्या कुटुंबीयांनी तिच्या सह मुलगी श्रीशाचे औक्षण करत तिला ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत व फुलांची उधळण करत तिचे स्वागत केले. यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे लावून टाळ्यांच्या गजरात या मायलेकीचे स्वागत करण्यात आले मुलीच्या रुपाने घरात लक्ष्मी आली असे म्हणत मुलीच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या बोऱ्हाडे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous articleखेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न
Next articleहवेली पंचायत समितीच्या उपसभापती हेमलता बडेकर यांची निवड