खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

Ad 1

राजगुरूनगर -खेड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस महिला बूथ कमिटी नियोजन आढावा बैठक (दि.२) रोजी पार पडली.या बैठकीला आदरणीय सुरेखाताई मोहिते पाटील ,जिल्हा अध्यक्ष वैशालीताई नागवडे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष संध्याताई जाधव यांनी उपस्थित महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी तालुक्यातील महिलांना निवडीची पत्र देण्यात आली असून त्यात जिल्हा उपाध्यक्षपदी बेबीताई कड व कांचन ताई ढमाले,खेड तालुका कार्याध्यक्षपदी सीमा साठे, खेड तालुका उपाध्यक्षपदी मनीषा ठाकूर व चाकण शहर अध्यक्ष पदी सुजाता शहा व उपाध्यक्ष पदी प्रियांका पवार यांची निवड करण्यात आली आहे.