लोणी काळभोर येथील दै.लोकमतचे पत्रकार तुळशीराम घुसाळकर ‘कोरोना योध्दा’ पुरस्काराने सन्मानीत

Ad 1

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्थेच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने कोरोना काळात कार्यरत असणाऱ्या समर्पित योध्दांचा सन्मान

गणेश सातव,वाघोली,पुणे

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व तेजस्विनी संस्थेच्यावतीने नुकतीचं लोणी काळभोर येथील मधुबन लॉन्स कार्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती,जेष्ठ शिक्षणततज्ञ, मिसाईलमँन,भारतरत्न स्व. डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्ताने पार पडलेल्या छोटेखानी सोहळ्यात कोरोना काळात अहोरात्र कार्यरत राहून जनतेची सेवा करणाऱ्या आरोग्य,पोलीस,महसूल प्रशासन,पत्रकारिता व इतर काही क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या बांधवांचा उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते “कोरोना योध्दा”पुरस्कार देऊन ‘कृतज्ञता सन्मान’ करण्यात आला.

या सोहळ्यात आपल्या हवेली तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य,सल्लागार,लोणी काळभोर परिसरात दै.लोकमत वृत्तपत्राच्या वार्तासेवेसाठी सतत कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार आदरणीय तुळशीरामजी घुसाळकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन “कोरोना योध्दा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग,पुणे अधीक्षक संतोष झगडे,लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचे उपनिबंधक राम कुलकर्णी,वाघोली येथील आयमँक्स् हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.रघुनाथ रामकर,हवेली तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र(बापू)काळभोर,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे,संस्थापक,उपाध्यक्ष राजकुमार काळभोर,विश्वस्त अनिल खळदकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.