राजगुरूनगर मध्ये महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांच्या पाठीवर राज ठाकरे यांची कौतुकाची थाप

Ad 1

राजगुरुनगर-खेड तालुक्यातील ग्राहकांना येणाऱ्या भरमसाट वीजबिलांविरोधात महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाची तोडफोड करणाच्या मनसैनिकांना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेऊन सत्कार केला.यावेळी राज ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर राहण्याचे आदेश दिले.

तालुक्यातील  वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाट वीजबिले करण्यात आली होती.या बिलांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष समिर थिगळे यांच्या नेतृत्वाखाली मनवीसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत,खेड तालुका सचिव नितीन तावडे, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सोपान डुंबरे यांनी ९ ऑक्टोबर रोजी  उपकार्यकारी अभियंत्यांच्या केबिनची तोडफोड केली होती. या आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणल्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोडफोड प्रकरणी त्यांना अटक होऊन १२ दिवस येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगावा लागला होता. कार्यकर्त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज ठाकरे यांनी त्यांना मुंबई येथे बोलावून घेऊन तेथे त्यांचा सत्कार केला.

या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष
समीर थिगळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, तालुकाध्यक्ष संदीप पवार,उपाध्यक्ष सनी दौंडकर, महेश खलाटे,अजय तापकीर उपस्थित होते.