डाॅ.अमोल कोल्हे बरं झालं तुम्ही आमचे “खासदार” झालात

अमोल भोसले

एक वर्षापूर्वी झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट असताना शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ते ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काही दिवस आगोदर उमेदवारी जाहीर झालेले व प्रचारादरम्यान संपूर्ण मतदारांपर्यंत न पोहोचलेले डाॅ.अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले. त्यावेळी पत्रकार म्हणून या मतदार संघच्या निवडणुकीच्या खूप बातम्या देखील केल्या.

निवडणुकीचा निकाल आल्यानंतर शिरुर लोकसभा मतदार संघात परिवर्तन झाल्याचे समाधान देखील वाटले. परंतु निवडणुकीनंतर खासदार म्हणून किंवा त्यांच्ये काम, कामाची पद्धत, मतदार संघाच्या विकासासाठीचे व्हीजन फार काही माहीत पडले नाही. केवळ मतदार संघातील लोकांकडून ऐकले की खासदार मतदार संघात फिरकतच नाही…. लोकांच्या काहीच कामाचे नाहीत… ऐवढेच नाही तर ते काय एक कलाकार… छत्रपती संभाजीराजे मालिकेमुळे निवडुन आले…. हे काही प्रमाणात खरे देखील आहे… पण डॉ. अमोल कोल्हे यांना काय पुन्हा निवडणूक लढवायची नसणार म्हणून ते मतदार संघाकडे लक्ष देत नाही… असा अनेक प्रचार कानावर येत होता.

खासदार म्हणून तुम्ही आपल्या मतदार संघाच्या विकासाचा किती बारकाईनं विचार करता हे “पूर्व हवेली भागातील रिंगरोड संदर्भात” चर्चा दरम्यान कळले. प्रश्न समजावून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात हे कृतीतुन जाणवलं. तुमच्या शिरुर लोकसभा मतदार संघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा मतदार संघ येतात. या प्रत्येक मतदार संघात पुढील चार वर्षांत काय-काय करता येईल हे देखील तुम्ही सांगितले. पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडी, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग, जुन्नर पर्यटन विकास, भक्ती – शक्ती-पर्यटन केंद्राचा विचार, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील आदिवासी भागातील नैसर्गिक साधन-संपत्ती अधिक समृद्ध करण्यासाठीचा राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्राचा विचार, अशा अनेक लहान-लहान गोष्टींचा विचार करत असल्याचे लक्षात आले. बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी नक्की काय करावे लागेल राजकारण न करता या विषयाकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोन खरच भावला. आपल्या मतदार संघातील … आपला खासदार…. आपल्या भागाच्या विकासासाठी खूप मायक्रो लेव्हलवर जाऊन विचार करतो याचे समाधान देखील वाटले…डाॅ. अमोल कोल्हे बर झालं तुम्ही आमचे खासदार झालात… खूप खूप शुभेच्छा.

डाॅ.अमोल कोल्हे खरच तुम्ही नकाच अडवणूक पडू लग्न आणि दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात
शिरुर लोकसभा मतदार संघात व मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींना व मतदारांना देखील आपण पाच वर्षे काहीही विकास कामे न करता केवळ दिवसाला पाच – सहा लग्न समारंभ किंवा दशक्रिया विधीचे कार्यक्रम केले की आपले काम संपले असा गैरसमज निर्माण झाला आहे. मतदारांना देखील आपला खासदार, आमदार लग्न – कार्याला उपस्थित राहात नसेल तर काही कामाचा नाही असेच वाटते आता ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. याबाबत डाॅ. कोल्हे यांचे परखड मत देखील पडले. मला माझ्या मतदार संघाचा विकास करायचा हि आस्था खासदार डॉ. कोल्हे यांच्या बोलण्यातून जाणवली.

Previous articleकोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल जॉली क्लब मंडळाचा गौरव
Next articleचाकण मध्ये कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल चाकण यंग जॉली क्लबचा गौरव