कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल जॉली क्लब मंडळाचा गौरव

Ad 1

चाकण-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यंग जॉली क्लबचा पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

चाकण शहरातील यंग जॉली क्लब मंडळामार्फत अन्नदान, किराणा किट वाटप, सॅनिटायझेशन असे अनेक उपक्रम राबविण्यात आल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष वैशालीताई नागवडे आणि सुरेखा ताई मोहिते पाटील, संध्याताई जाधव अध्यक्ष खेड तालुका, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला कमिटी सर्व सदस्य,रामशेठ गोरे ,चाकण शहर अध्यक्ष यांच्या हस्ते यंग जॉली क्लब मंडळाचा आदरपूर्वक सन्मान करुन गौरव करण्यात आला.

प्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते ऋषिकेश वाव्हळ,नितिन वाव्हळ,गौरव डंबीर,प्रतीक गंभीर,ऋषिकेश वाव्हळ हे उपस्थित होते.