साप चावलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Ad 1

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वळती (ता.आंबेगाव) येथील महिलेचा हाताला साप चावल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडली.याबाबत संतोष म्हातारबा आजाब यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार (दि. २३) रोजी भामाबाई बबन आजाब (वर्ष ५५ रा.वळती ता.आंबेगाव जि. पुणे) या गावातीलच रवींद्र भानुदास लोखंडे यांच्या शेतात भुईमूग काढण्यासाठी गेल्या होत्या त्या वेळी भुईमूग काढत असताना सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या हाताला साप चावल्याने रवींद्र लोखंडे यांनी याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कळवून त्यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.भामाबाई आजाब यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याबाबत संतोष आजाब यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर कदम करत आहे.