रंभा चॅरिटेबल ट्रस्ट व दमानी कुटुंबीय यांच्याकडून खेड तालुक्यातील पूर्व भागात मोफत किरणा किटचे वाटप

राजगुरूनगर- मध्यंतरीच्या कोरोनाचा पार्दुभार्व वाढल्याने गरिब कुटुंबियांचा रोजगार बुडाला आहे. उपासमार होऊ होऊ नये म्हणून रंभा चॅरिटेबल ट्रस्ट व दमानी कुटुंबीय यांच्याकडून खेड तालुक्याच्या पुर्व भागात १४८ कुटुंबियांना मोफत किरणा किट वाटप करण्यात आले आहे.

निराधार महिला, अपंग व्यक्ती, पोषणाची गरज असणारी बालके, गरोदर व स्तनदा माता यांच्याबरोबरच आदिवासी, स्थलांतरित, शेतमजूर आणि भूमिहीन अशा कुटुंबांची होणारी दयनीय अवस्था लक्षात घेऊन याचाच एक भाग म्हणून ट्रस्टने दावडी गावातील ठाकर वस्ती भागात ४८ कुटुंबाना व जाऊळके बुद्रुक (ता खेड ) मधील ठाकर वस्ती, पारधी वस्तीमधील १०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. एका कुटुंबास महिनाभर उपयोगी असे धान्य व स्वच्छता साहित्य किट देण्यात आले त्यामध्ये एकूण ११ जीवनावश्यक वस्तुचा समावेश आहे. या परिसरातील कुटुंबांचा सर्व्हे करून गरजू कुटूंबाची यादी बनवली गेली व त्यानुसार दिलेले हे साहित्य गुणवत्तापूर्ण व महिनाभर पुरेसे असल्यामुळे लाभार्थी कुटुंबांनी समाधान व्यक्त करित आहे.

१० किलो गहू, ८ किलो , तांदूळ २, खाद्य तेल १ किलो, हरभरा १ किलो , हरभरा डाळ १ किलो , मसूर डाळ१ किलो, दिड किलो साखर, १०० ग्रॅम चहा पावडर , २ नग कपड्याचे साबण, २ नग हात धुण्यासाठी साबण, १ पॅकेट राजगिरा लाडू या वस्तु चा समावेश आहे.

यावेळी सी एस आर कार्यक्रम व्यवस्थापक रणजित पुजारी, सदाशिव आमराळे, संतोष गव्हाणे, निलेश शिंदे, साहेबराव गाडगे, महेंद्र ओव्हाळ, सुनिल गव्हाणे, मनोज बोत्रे व राजू मुलाणी उपस्थित होते.अंगणवाडी सेविका मीनाक्षी कराळे, सुनीता केदारी यांनी जऊळके येथे किरणा येथे वाटपासाठी मदत केली.

Previous articleजनतेच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर रहा राजगुरूनगर एमएसईबी तोडफोड केलेल्या कार्यकर्त्यांवर राजसाहेब ठाकरे यांची कौतुकाची थाप
Next articleखेड घाट बायपास रस्त्याचे व विद्युतीकरणाचे काम लवकर पूर्ण करा- खासदार डॉ. कोल्हे