जनतेच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर रहा राजगुरूनगर एमएसईबी तोडफोड केलेल्या कार्यकर्त्यांवर राजसाहेब ठाकरे यांची कौतुकाची थाप

Ad 1

मुंबई-राजगुरूनगर येथील एम एस ई बी विरोधात केलेल्या तोडफोड आंदोलनामुळे जेलवारी भोगलेल्या खेड तालुक्यातील मनवीसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, खेड तालुका सचिव नितीन ताठे, राजगुरूनगर शहर अध्यक्ष सोपान डुंबरे यांना आज मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेऊन कौतुक केले.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, तालुका अध्यक्ष संदीप पवार,उपाध्यक्ष सनी दौंडकर,महेश खलाटे, आळंदी शहर अध्यक्ष अजय तापकीर उपस्थित होते..

जनतेच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर राहण्याचा आदेशही राजसाहेबांनी दिल्याचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांनी सांगितले..