पूर्व हवेली तालुक्यात कोरणा संसर्ग करतोय जोमाने वाटचाल ! उरुळी कांचनमध्ये सापडला नव्याने रुग्ण

अमोल भोसले, उरुळी कांचन —प्रतिनिधी

उरुळी कांचन येथे डाळिंब रोडला राहणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाचा  कोरोना संसर्ग तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ.सूचिता कदम यांनी दिली, या रुग्णाला पुण्याला पाठविण्यात आले आहे, हा रुग्ण कुरकुंभ येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता पण लॉंकडाऊनमुळे सध्या तो मित्राच्या रूमवर उरुळीत राहत होता त्याला त्याच्या गावाला बेंगलोरला जायचे होते म्हणून कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली  तर त्याच्या संपर्कात आलेल्या लोणी काळभोर येथील नागरिकांची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली आहे तसेच हडपसर येथील एका मोठ्या खाजगी कंपनीत कामाला असलेल्या कोरेगावमूळ येथील मुळ रहिवासी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला गेल्या महिन्यापूर्वी कोरोणा संसर्ग झाला होता , तो बरा होऊन घरी १४ दिवस कोरंटाईन राहिला होता मात्र कामावर जाण्यासाठी फिटनेस सर्टिफिकेटसाठी पुन्हा त्याची कोरोना टेस्ट केली असता तो तपासणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने कोरेगावमुळच्या नागरिकात चांगलीच घबराट उडाली आहे तसेच  येथीलच एका ३६ वर्षीय महिलेचा व तिच्या १४ वर्षीय मुलाची  तपासणी पॉझिटिव्ह आल्याने कोरेगांवमूळ येथील कोरोनाग्रस्त रुग्णाची  संख्या ३ झाली आहे, ही महिला लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात कामाला आहे,

     उरुळी कांचन आणि परिसरामध्ये गेल्या सुमारे १५ ते २० दिवसात कुठल्याही पद्धतीने रुग्णांमध्ये वाढ झाली नव्हती परंतु आज सापडलेल्या डाळिंब रोडच्या रुग्णामुले व कोरेगावमुळ मध्ये नव्याने बाधीत झालेल्या २  रुग्णामुळे परिसरावर कोरोणाचे संकट पुन्हा गडद होताना दिसत आहे,  कोरोना संसर्ग होण्याची साखळी वाढत चालली आहे त्यामुळे पुणे सोलापूर रोड वरील महत्त्वाच्या गावांना कोरोना संसर्गाने पुन्हा घट्ट विळखा घातला असल्याची परिस्थिती उद्भवलेली असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleमहावितरणने जादा दराचे व जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादलेले वीज बील कमी करण्याची उरुळी कांचन भाजपकडून मागणी
Next articleप्रतिक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस सेवेत घ्या