दुसऱ्याचे घर बळकावल्यामुळे दांपत्याला अटक

नारायणगाव, (किरण वाजगे) :

नारायणगाव येथे आयत्या वर कोयता अर्थात आयत्या बिळावर नागोबा ही म्हण सार्थ ठरली आहे. एका दाम्पत्यांने एका रो हाऊसवर बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी नवरा बायको वर गुन्हा दाखल झाला आहे.

बंद घराचे कुलूप तोडून ते बेकायदेशीररित्या बळकावल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दांपत्याला अटक केली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर नारायणगाव परिसरातील कोल्हेमळा तालुका जुन्नर येथे घडली आहे.

या प्रकरणी सुलभा चंद्रशेखर को-हाळे (वय ४९) यांनी फिर्याद दिली त्यावरून संग्राम जगन्नाथ घोडेकर व रत्ना संग्राम घोडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.जुन्नर न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायणगाव येथील सुलभा चंद्रशेखर को-हाळे (वय ४९ वर्ष ,व्यवसाय गृहिणी, रा. नारायणगाव मुक्ताई ढाब्या शेजारी )पुणे नाशिक हायवे (ता.जुन्नर जि. पुणे) यांनी नारायणगाव पोलिसात संग्राम जगन्नाथ घोडेकर व रत्ना संग्राम घोडेकर (दोघे रा.नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की.२३ ऑक्टोबर रोजी १०.०० वा. ते दि २४ ऑक्टोबर रोजी १० च्या दरम्यान फिर्यादी यांची मालकीचे मौजे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हद्दीतील कोल्हेमळा रोड लगत असलेल्या कुबेर मधूकोश सोसायटी मधील जमीन स नं २६१/२ मधील रो हाऊस नं एच १०५ आहे . यात संग्राम जगन्नाथ वाडेकर व रत्ना संग्राम घोडेकर दोघे (रा.नारायणगाव, ता.जुन्नर) यांनी दरवाजाचे कुलूप तोडून कोरा-ळे यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या मालकीच्या रो हाऊस मध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून राहत आहे.याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुंड पुढील तपास करत आहेत.

Previous article“शिक्षक काॅलनी’ परिसरासाठी सर्व सेवासुविधा पुरविणार – आमदार दिलिप मोहिते पाटील
Next articleजुन्नर वनविभागाच्या जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन स्पर्धेत संजय नाईकरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक