ग्रामपंचायत साबळेवाडी येथे विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ

Ad 1

चाकण-खेड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत साबळेवाडी येथे उद्या शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे ,आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.

या नियोजित उद्घाटन कार्यक्रमात
जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे 3.00 लक्ष, अंगणवाडी दुरुस्ती करणे 14 वा वित्त आयोग 3.00 लक्ष,रस्ता काँक्रीटीकरण करणे 2.99 लक्ष 14 वा वेतन आयोग,ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 10.00 लक्ष ,सभागृह 3.00 लक्ष ,अंबिका माता मंदिर मैदान परिसर पीसीसी करणे 5.00 लक्ष इत्यादी कामांचा उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहावे असे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सदस्य यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.