वाघोली मध्ये ३ लाख ४२ हजाराचा अवैध गुटखा जप्त; दोनजण पोलिसांच्या जाळ्यात

Ad 1

गणेश सातव वाघोली पुणे

 महाराष्ट्रात गुटखा पानमसाला किंवा अंतिमतः गुटखा किंवा पानमसाला गठित होऊ शकेल असा पदार्थ सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी,तंबाखू इत्यादी उत्पादन, साठा,वितरण,विक्री,वाहतूक यावर बंदी घातलेली असताना वाघोली येथे २४ ऑक्टोबर रोजी३ लाख ४२ हजाराचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

गुन्हे शोध पथक वाघोली गावच्या हद्दीत कोरोना साथीच्या रोगाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे करीता वाघोली गावात पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या आदेशाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना एक इसम लाल रंगाच्या बजाज कंपनीची सी टी १०० गाडी क्र. MH १२ NY ९०३० हीचेवरुन एक काळया रंगाची बॅग घेऊन एस टी कॉलनी येथून अहमदनगर – पुणे रोडवर विक्रम डेअरी समोरून येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास गुन्हे शोध पथकाने थांबवून त्याचेजवळील बॅगची चैन खोलून पाहणी केली असता त्यामध्ये पानमसाला, विमल,आर एम डी इत्यादीचे पॅकेट असल्याचे दिसून आले. त्यास ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव वसीम आक्रम मलिक वय २८वर्षे, (रा. एस टी कॉलनी, वाघोली,पुणे मूळ रा. हसुपुरा, बिजनुर, उत्तरप्रदेश) असे सांगितले.त्याच्याकडे सदर मालाबाबत विचारणा केली असता त्याने हा माल युसुफ नासिर अन्सारी (रा.भावडी रोड,वाघोली, पुणे) याचेकडून घेतले बाबत सांगितले. म्हणून वसीम मलिक यास सोबत घेऊन युसुफ अन्सारी याचे राहते घरी जाऊन पाहणी केली असता त्याचे घराखाली एक इसम संशयित रित्या मिळून आला त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सलीम अब्दुलखाली मलिक वय ३९ वर्षे, (रा.भावडी रोड, वाघोली,पुणे मूळ रा.सराई डाई,राजापूर,कोतवाली, उत्तरप्रदेश) असे सांगून तो युसुफ अन्सारी याचे सांगणे वरून पानमसाला, विमल,आर एम डी इत्यादी विकण्याचे काम करीत असल्याचे सांगितले.युसुफ अन्सारी याचे राहते घराचे वरील रुमची पाहणी केली असता तेथे केशर युक्त पानमसाला, विमल, व्हि १ तंबाखू,आर एम डी,सेंटेड गोल्ड तंबाखू, राज निवास पानमसाला, एन पी १० जर्दा जाफरानी व एक मोटार सायकल असा एकूण३,४२,४६२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे यांचे फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाणे गु.र.नं ९५९/२०२० भा.द.वी कलम १८८, २७३, अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ चे कलम २६(२),२७,३०(२)(१),२६(२) व साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.

सदर कामगिरी डॉ. अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण,विवेक पाटील अप्पर पोलीस अधीक्षक,पुणे विभाग, डॉ. सई भोरे पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी,हवेली विभाग, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर,गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे,श्रीमंत होनमाने, दत्ता काळे,समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे,संतोष मारकड,सूरज वळेकर, प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे.