सुरेशभाऊ लाड यांची विधानपरिषद सदस्यपदी राज्यपाल कोट्यातुन निवड व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा

अमोल भोसले,पुणे

कर्जत -खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांची विधानपरिषद सदस्य पदी राज्यपाल कोट्यातुन निवड व्हावी अशी कार्यर्कत्यांची मागणी आहे.

रायगड जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यात भाऊंचे मोठे योगदान आहे,विशेषता कर्जत, खालापूर तालुक्यात आजही भाऊंना मानणारा मोठा वर्ग आहे. भाऊंनी आजपर्यंत अनेक उद्योजक, नेतृत्व उभी केली.हे करत असताना विशाल दृष्टीकोन, निस्वार्थीपणा मनात ठेवला.

1999, 2009, 2014 या तीनही विधानसभेच्या निवडणुका जिंकत सातत्याने कर्जत,खालापूरचे प्रश्न विधानसभेत मांडत सोडवण्यासाठी पाठपुरावा केला अनुभव,संयम ही भाऊंच्या नेतृत्वाची वैशिष्ट्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाऊंना विधानपरिषदेत पाठवून आजपर्यंतच्या कार्याचा सन्मान करावा ही एक भाऊंचा कार्यकर्ता म्हणून आग्रही मागणी अभिजित काटकर यांनी केली आहे.

Previous articleकांद्याच्या बराखीवर चोरट्यांनी मारला डल्ला
Next articleधोकादायक स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची रेटवडी ग्रामस्थांनी मागणी