कांद्याच्या बराखीवर चोरट्यांनी मारला डल्ला

प्रमोद दांगट

कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. १५० रुपये कांद्याचे भाव सुरू असताना चोरांनी याचा फायदा घेण्यासाठी आंबेगाव सुपेधर येथे कांद्याची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली आहे. सुपेधर येथे कांद्याच्या बराखीवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. १० पिशव्या कांदा चोरांनी लंपास केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील सुपेधर येथील दशरथ लक्ष्‍मण ढेरंगे या शेतकऱ्याच्या साठवलेल्या कांद्याच्या बराखीतुन (दि. २३) ते (२४) रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यानी दहा पिशवी कांदा चोरून नेला असून या शेतकऱ्यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दशरथ लक्ष्मण ढेरंगे यांची सुपेधर येथे दोन एकर क्षेत्र असून त्यांनी त्यात कांद्याचे पीक घेतले होते. कांद्याचे पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांनी आपला कांदा शेतामध्ये बराकीत साठवून ठेवला होता दि.२३ रोजी ढेरंगे व त्यांची पत्नी यांनी तेरा पिशव्या कांदा भरून बराकीत ठेवला होता.त्यानंतर (दि.२४ )रोजी सकाळी ६ वाजता ते बराखी जवळ गेले असता त्यांना बराकीमध्ये भरून ठेवलेल्या १३ पिशव्या पैकी १० पिशव्या चोरीला गेलेल्या दिसल्या त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना पिशव्या कोठेही आढळून आल्या नाही याबाबत आपल्या कांदा चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

या घटनेत ढेरंगे यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून तालुक्यातील अगोदरही अशा अनेक घटना घडल्या आहेत.काही दिवसात कांद्याला बाजार भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे कांदा पीक चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून पिकवलेले पिक चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे व कांदा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Previous articleसिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त
Next articleसुरेशभाऊ लाड यांची विधानपरिषद सदस्यपदी राज्यपाल कोट्यातुन निवड व्हावी कार्यकर्त्यांची इच्छा