जयेश कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. समाजात वावरताना सामाजिक दूष्टीकोन ठेवून खूप काही करण्यासारखे आहे फक्त समाजासाठी करण्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे असे मत युवा कार्यकर्ते अक्षय कांचन यांनी व्यक्त केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अखिल तळवाडी मित्र परिवाराने गावातील वाड्यावस्तीवरील ऊसतोड कामगारांच्या लहान मुलांना युवा नेते जयेश कांचन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळून खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तोफीक शेख, गणेश कांचन, प्रतिक गोट्या कुंजीर, आदेश कांचन, नयन कांचन, अशितोष कांचन आदी उपस्थित होते.

Previous articleमाजी शिवसेना शहराध्यक्ष राहुल शेट्टी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next articleसिनेस्टाईल पाठलाग करत सुमारे पाच लाख २० हजार रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त