माजी शिवसेना शहराध्यक्ष राहुल शेट्टी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लोणावळा येथील येवले चहाचे दुकानाशेजारी माजी शिवसेना शहर अध्यक्ष राहुल उमेश शेट्टी वय-३८ वर्षे यांचेवर  गोळया झाडून व धारदार शस्त्राने वार करून हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .

याबाबत सविस्तर माहिती अशी की, या झालेले खुनाचा गुन्हा गंभीर असल्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, सहा पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांनी तात्काळ गुन्हयाचा अत्यंत शिघ्र तपासकार्य चालू केले होते. स्वतः पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे लोणावळा शहर पोलीस ठाणेमध्ये बसुन, गुन्हयाचे अनुशंगाने सुचना देवुन त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांची पथके तयार करून, तपासाची चक्रे फिरवली होती. या गुन्ह्यातील मारेक-यांना अटक करणेसाठी लोणावळा शहर पोलीस ठाणेमध्ये यापूर्वी सेवा बजाविलेले इतर पोलीस ठाणेतील पोलीस कर्मचारी यांना सुद्धा पाचारण करून त्यांचे करवी हत्या करणारे आरोपीचा माग काढणेचा प्रयत्न चालू केला होता.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व सहा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील हत्या करणारे आरोपीस लोणावळा शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथकाने या गुन्हयातील मयत राहुल उमेश शेट्टी वय-३८ वर्षे पांचेवर गोळया झाइून व धारदार कु-हाडीने वार करून हत्या करणारे आरोपी १) इब्राहिम युसुफ खान वय-३० वर्षे हल्ली रा. सैय्यदनगर, गल्ली नं-६, बी लाईन हडपसर पुणे मुळ रा. शहावली मोहल्ला, कब्रस्थानचे समोर, लातुर २) मोहन उर्फ थापा देवबहादुर मल्ला वय- ४७ वर्षे हल्ली रा.बॅटरीहिल संडाळा ता.मावळ जि पुणे मुळ गाव भैरवा, लुंबिनी नेपाळ यांना पुणे येथूनअटक करणेत आलेली असून न्यायालयामध्ये हजर करणेत येणार आहे.

आरोपी मोहन उर्फ थापा हा सुद्धा शिवसेना पक्षाशी संबंधित असुन, त्याने गुन्हयामध्ये सहभाग घेतलेला असल्याने राहुल शेट्टी यांचे हत्येचे मागे काही राजकिय वैमनस्य आहे का ? याचा सुद्धा तपास चालू असुन यामध्ये कोणत्या राजकिय व्यक्तिंचा संबंध आहे का ? या बाबत तपास करणेत येत आहे

या गुन्हयातील आरोपींनी मयत राहुल शेट्टी यांची हत्या करणेचा कट का ? रचला याबाबतचा तपास चालू असुन, या गुन्हयामध्ये  १) सुरज विजय अगरवाल वय-४० वर्षे रा.फ्लेंट नं-४, गुरुकृपा अपार्टमेंट, प्रधानपार्क सौसायटी, लोणावळा ता.मावळ जि पुणे २) दिपाली राहल भिलारे वय-३६वर्षे रा.फ्लॅट नं-१, डी विंग, रचना गार्डन सोलायटी, भांगरवाडी, लोणावळा ता.मावळ जि पुणे यांना अटक करणेत आलेली असुन, त्यांना (दि.३१) रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करणेत आलेले असुन, गुन्हयातील पाहिजे असलेले आरोपी १) मुबीन जनीर इनामदार रा.भैरवनाथनगर, कुसगाव लोणावळा ता.मावळ जि पुणे, २) कादर नजीर इनामदार रा.भांगरवाडी लोणावळा ता.मावळ जि पुणे, ३) सादीक माहिम बंगाली रा.गावठाण, लोणावळा ता.मावळ जि पुणे यांचा शोध घेणेसाठी पथके तयार करणेत आलेली आहेत.

प्रस्तुत गुन्हयातील हत्या करणारे मुख्य आरोपीस पोलीसांनी सी. सी.टी.वही फुटेज व गोपनिय बातमीदारा मार्फत मार्ग काढून अटक करणेत आलेली आहे. या गुन्हयाची संवैदनशिलता पाहुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी लोणावळा शहरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Previous articleतिन्हेवाडीत बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा
Next articleजयेश कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊ वाटप