तरुण पिढीला योग्य संस्कार व अध्यात्मिक आवड होणे आवश्यक-विद्याद्यर शहापूरकर

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

महानुभाव पंथातील साधुसंत किंवा परमेश्वर भक्त आहेत ते वेळात वेळ काढून नवरात्राच्या काळात नऊ दिवस एखाद्या स्थानाच्या किंवा आश्रमांच्या ठिकाणी जाऊन परमेश्वराचे नामस्मरण करत असतात. धावपळीच्या जीवनात सदभक्तानी वेळात वेळ काढून परमेश्वर भक्ती साठी दिला पाहिजे यामधून तुम्हाला निश्चितच अध्यात्मिक सुख समाधान लाभेल. उद्याच्या तरुण पिढीला योग्य संस्कार व अध्यात्मिक बाबतींत आवड निर्माण झाली पाहिजे ते ज्ञान बिज रुजविण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे असे प्रतिपादन कोरेगावमुळ (ता.हवेली) श्रीकृष्ण मंदिराचे संचालक – श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त महंत विद्याद्यरबाबा शहापूरकर यांनी व्यक्त केले.

कोरेगावमुळ (ता.हवेली) श्रीकृष्ण मंदिर याठिकाणी नवरात्र उत्सव निमित्त पूजापाठ आरती प्रवचन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शहापूरकर बाबा बोलत होते.

याप्रसंगी श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल कोलते, अनिलराज महानुभाव, जयसिंग भोसले, शिवाजी भोसले, रामदास भोसले, बापु गिरे, शंकरराव सोनवणे, बापु बनकर, शांताराम चौधरी, तुकाराम ताटे, उमेश सरडे, दादा गायकवाड, संदीप सरडे, राजु भंडारी, संपत भोरडे, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र खेडेकर, अमित सावंत, रामभाऊ बोधे , आप्पासो महाडिक, प्रशांत सरडे आदी संत – तपस्वीनी गुरुआई, महिला, सदभक्त उपस्थितीत होते. श्रीकृष्ण मंदिर – श्रीकृष्ण अध्यात्मिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टनशिंगचे पालन करत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.