दावडी येथे नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा

Ad 1

राजगुरूनगर-दावडी ( ता. खेड ) येथे नवरात्र उत्सव अतिशय साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. गावात गणपती व नवरात्र उत्सव या वर्षी साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. महालक्ष्मी मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते घटाला नैवेघ अर्पण केला.

यावेळी दावडीचे बीट अंमलदार संतोष मोरे, गुप्त वार्ताचे संदिप भापकर , माजी सरपंच संतोष गव्हाणे ,पंचायत समिती सदस्य वैशाली गव्हाणे ,माजी जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई सातपुते ,खेड पोलीस महिला दक्षता समिती अध्यक्षा रूपालीताई गव्हाणे इत्यादी उपस्थित होते. या वेळी सर्व ग्रामस्थ नवरात्री ग्रुपच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व हजर होते. .