अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या दोघांना नारायगाव पोलिसांकडून अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या दोन युवकांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. नारायणगाव पोलीस ठाण्यामध्ये दि. २२ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या गुन्हयामधील आरोपी तुषार प्रभाकर जाधव वय १९ वर्ष या युवकाने त्याचा मित्र साईप्रसाद हनुमंत देवाडे वय १९ वर्ष याच्या सहाय्याने फूस लावून पळवून नेले होते.

या घटनेमधील अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात नारायणगाव पोलीस स्थानकातील पोलीसांना यश आले असून या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे व तिचा विनयभंग करून तिला फूस लावून पळवून नेणे अशा गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार भा. द. वि. कलम ३५४ (ए) (डी) सह कलम ८, १२ पोस्को कायदया अंतर्गत यातील आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपींना पोलीसांनी खेड सत्र न्यायालयात हजर केले असता. खेड सत्र न्यायालयाने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली. या गुहयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

Previous articleवेश्या व्यवसाय चालवत असलेल्या सह्याद्री लॉजवर पोलिसांची कारवाई
Next articleदावडी येथे नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा