पंचेचाळीस तासानंतर चासकमान धरणात वाहुन गेलेल्या आजीचा मृतदेह मिळाला

राजगुरूनगर- चास कमान धरणात वाहुन गेलेल्या भोराबाई बुधाजी पारधी यांचा मृतदेह आज ४५ तासानंतर पडला. तर नातु साहिल याचा मृतदेह काल शुक्रवार (दि.२३) रोजी सकाळी ९ वाजता सापडला होता.

मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या १४ जणांच्या पथकांनी दोन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने केलेल्या शोध मोहिमेत अखेर आजी आणि नातु या दोघांचे मृतदेह मिळाले आहेत.

चासकमान धरणाच्या कहु गावच्या डोगंरावरील ठाकरवाडीत राहणारे ठाकर कुंटुबातील बुधाजी ठाकर यांच्या पत्नी चे आणि नातवाच्या मूत्युने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या घटनेला दोन दिवस झाले असून या कुटूंबाला कोणतीही शासकीय मदत करण्यात आली नाही तसेच एकही स्थानिक लोकप्रतिनिधी या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले नसल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Previous articleसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगता आले पहिजे – रघुनाथ येमुल गुरुजी
Next articleकहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबाचे लोकप्रतिनिधीनी भेट घेऊन केले सांत्वन