सामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगता आले पहिजे – रघुनाथ येमुल गुरुजी

अमोल भोसले,उरुळी कांचन

बदलत्या काळानुसार भयमुक्त जीवन जगता येण्यासाठी “गो ध्यान” मेमाणे फार्म याठिकाणी सुरु करण्याचा मानस आहे. अध्यात्मिक व समुपदेशक मध्ये रघुनाथ येमुल गुरुजीचा मोठा अभ्यास आहे याचा लाभ ग्रामीण भागातील माणसाला घेता आला पाहिजे अशी माहिती मेमाणे फार्मचे संस्थापक अध्यक्ष किशोर मेमाणे यांनी दिली. चित्रपट अभिनेते संजय दत्त यांना कँन्सर या दुर्धर आजाराने ग्रासले होते. मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर त्यांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. संजय दत्त यांचे कुटुंबीय तसेच मित्र परिवार हितचिंतक आणि सपूर्ण चित्रपट क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. अशावेळी अध्यात्मिक ध्यानगुरु आणि समुपदेशक रघुनाथ येमुल गुरुजी यांनी संजय दत्त यांना स्वाथ्य लाभावे यासाठी सारेच प्रार्थना करत होते.

अशावेळी अध्यात्मिक ध्यानगुरु आणि समुपदेशक रघुनाथ येमुल गुरुजी यांनी संजय दत्त आणि त्याच्या कुटुंबीयांना धिर दिला व समुपदेशन केले. काही मंत्र, जप, शक्ती आणि अध्यात्मिक उपचार केले. अखेर संजय दत्त कँन्सरवर मात करण्यात यशस्वी ठरले. कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांचे अथक प्रयत्न, कुटुंबीय आणि चाहत्यांचे प्रेम, परमेश्वराची कृपा आणि मुख्यतः ध्यानगुरु येमुल गुरुजी यांचे मोलाचे समुपदेशन मार्गदर्शन आणि आशिर्वादामुळे मि कँन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करु शकलो अशी भावना चित्रपट अभिनेते संजय दत्त यांनी दिली.

Previous articleडॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्वचं कर्मचारी रुग्णांसाठी ‘देवदूत’- डॉ.राहुल कराड
Next articleपंचेचाळीस तासानंतर चासकमान धरणात वाहुन गेलेल्या आजीचा मृतदेह मिळाला