डॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्वचं कर्मचारी रुग्णांसाठी ‘देवदूत’- डॉ.राहुल कराड

Ad 1

गणेश सातव, वाघोली

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणकाळांत रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्व कर्मचारी रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत.कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरू असलेल्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीतही आपल्या जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता सर्व लोकांनी आपल्या घरात सुखरूप राहावे यासाठी विविध रूपाने,विविध मार्गाने अहोरात्र झटले असल्याने ख-या अर्थाने ते कोरोना योद्धे ठरले आहेत.असे प्रतिपादन माईर्स एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी केले.

          नवरात्रीच्या ७ व्या माळेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मधील डॉक्टर,नर्स,वाहन चालक, सफाई कामगार आदींनी कोविड महामारीत गेले सहा ते सात महिन्यांच्या कालावधीत अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता उत्कृष्ट सेवा दिली. या कामातून कोविडचा सामना न घाबरता करा असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स,नर्स यांचेसमवेत इतर सर्व कर्मचारी यांचा सन्मान कोरोना योद्धा म्हणून डॉ. राहुल कराड व विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अदिती कराड यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थितांना ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

            यावेळी डॉ.नामदेव जगताप,डॉ.विजय टेंगळे, डॉ.संदीप शिंदे,डॉ.सुशांत शिंदे,डॉ.छगन खारतोडे,डॉ. पी.के.देशमुख यांचेसमवेत रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.