महावितरणने जादा दराचे व जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादलेले वीज बील कमी करण्याची उरुळी कांचन भाजपकडून मागणी

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

महावितरणने जादा दराचे व जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादले आहे ते कमी करण्याची उरुळी कांचन भाजपकडून मागणी. लॉक डाऊन काळात महावितरण कडून घरगुती मीटर रिडींगचे काम बंद असताना व लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महावितरणने रिडींग घेऊनही जादा युनिटचे विज देयक ग्राहकाच्या मानगुटीवर लादले आहे. यावाढीव देयकांमुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड बसणार असुन महावितरणने तात्काळ वीज बिले दुरुस्त करण्याची मागणी उरुळी कांचन भाजपच्या वतीने उरूळीकांचन उपविभागाचे उप कार्यकारी अभियंता प्रदिप सुरवसे यांना निवेदन देऊन केली आहे

भाजपच्या वतीने युवा नेते अजिंक्य कांचन ,सुनिल गायकवाड , भिमराव चौधरी , सर्जेराव चौधरी, म्हस्कु चौधरी , महेश गायकवाड व विठ्ठल मारणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे. या निवेदनात मुखत्वे उरुळी कांचन उपविभागांतर्गत गावातील जनतेला वाढीव विज बिलाचा झटका बसला आहे. कोरोना काळात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर या परिसरात वीज ग्राहकांची मिटर रिडींग घेताना खाजगी एजन्सी कडून चुकीचे रिडींग घेतले आहे किंवा मीटर रिडींगचे प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तींनी ते काम केले असण्याची श्यक्यता नाकारता येत नसल्याने जादा आकारणी झाली असावी अथवा जागेवर बसून रिडींग देण्याचा प्रकार झाल्यामुळे हा वाढीव वीजेच्या बिलांचा बोजा ग्राहकांवर पडला आहे. सद्यस्थितीत ग्राहकांना वीज बिले भरणे शक्य नसल्याने वाढीव बिले दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी युवा नेते अजिंक्य कांचन, सुनिल गायकवाड व गणेश चौधरी यांनी उपअभियंता प्रदिप सुरवसे यांच्याकडे केली आहे.

वीज बिला संदर्भात तक्रारी आल्या आहेत…. येणार आहेत, परंतु एप्रिल मध्ये विजेच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे ती जादा वाटत आहेत, ग्राहकांना लॉकडाऊन काळात प्रत्यक्ष मीटर रिडींग घेतले नसताना सरासरी वापर गृहीत धरून वीज बिले दिली होती परंतु आता प्रत्यक्षात मीटर रिडींग घेऊन वापर केलेल्या युनिटचे बिल नेहमीप्रमाणे देण्यात येणारे लाभ देऊन दिली आहेत तरीही ज्या कोणा ग्राहकाला बिल चुकीचे आहे असे वाटत असेल त्याच्या बिलाची तपासणी करून चुकीचे असेल तर ते दुरुस्त करून दिले जाईल असे अश्वासन प्रदीप सुरवसे यांनी यावेळी दिले.

जाहिरात