वाडा येथे कोरोना यौद्धांना कोरोना किटचे वाटप

राजगुरूनगर- वाडा (ता.खेड) येथे पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, सलून व्यावसायिक यांना आज वाडा कडूस गटाच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ तनुजाताई घनवट यांच्या हस्ते ‘कोरोना किट ‘ चे वाटप करण्यात आले.

वाडा ग्रामपंचायतला 17 सॅनिटायझर स्टॅन्ड, 5 लिटरचे एक कॅन, व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सलून व्यावसायिक यांना प्रत्येकी एक एक कोरोना किट देण्यात आले. त्यावेळी वाडा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य तनुजा घनवट यांचा सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रम सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आला.

Previous articleहॉटेल मराठा फॅमिली रेस्टॉरंट च्या दुसऱ्या शाखेचे उद्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन
Next articleडॉक्टरांसमवेत आरोग्य क्षेत्रातील सर्वचं कर्मचारी रुग्णांसाठी ‘देवदूत’- डॉ.राहुल कराड