अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मंचर पोलीसांनी कारवाई

Ad 1

प्रमोद दांगट, निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंचर बेल्हा रोडवर खडकी फाटा येथे टिपर या वाहनातून तीन ब्रास वाळू बिगर परवाना घेऊन जाणारे टिपर चालकावर गस्त घालत असलेल्या मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक २० रोजी मंचर पोलीस ठाण्याचे पो. कॉ. शिवाजी चितारे,पो.ना. रमेश करंडे, हे मंचर बेल्हा रोडवर खडकी गावच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना रोडवर टाटा कंपनीचा टिपर एम. एच.१६ के. वाय. ९८१३ हा मिळून आला यावेळी वाहनांची तपासणी केली असता वाहनात पंधरा हजार रुपयाची तीन ब्रास वाळू मिळाली. यावेळी पोलिसांनी वाहन चालका कडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राहुल पुंडलिक भाईक ( वय २९ रा. कातळवेढा ता. पारनेर जि. अहमदनगर )असे सांगितले.

तसेच त्याच्याकडे वाळू वाहतूक करण्याची कुठलीही परवानगी व रॉयल्टी भरलेली पावती मिळाली नाही. याबाबत मंचर पोलीस ठाण्याची पो. कॉ. शिवाजी चितारे यांनी या वाळू चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो. ना. सागर गायकवाड करत आहेत.