अवघ्या साडे पाच वर्षांच्या रोशनी आव्हाळे या चिमुकलीने दुथडी भरलेल्या भीमा नदीला केले पार

प्रमोद दांगट

अनेक दिवसांपासून सर्वत्र पावसाचा जोर कायम असल्याने ओढे व नद्याना पुर आले आहेत. मात्र या परिस्थितीत दौंड तालुक्यातून खळखळून दुथडी भरून वाहणारी भीमा नदीला एका साडे पाच वर्षांच्या मुलीने पार केले आहे.ही नदी पाहूण अनेकांच्या मनात धडकी भरेल अशा परिस्थितीत नदी पात्राच्या जवळ जाण्याचे कोण धाडस करणार नाही.

मात्र दौंड तालुक्यातील कोरेगाव भिवर येथील साडेपाच वर्षांच्या रोशनी आव्हाळे या चिमुरडीने या नदीच्या पाण्यात उडी घेत भीमा नदी पोहत पार करण्याची किमया साधली असल्याने या मुलीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या धाडसाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रोशनी आव्हाळे हिने आपले वडील महेश आव्हाळे यांच्याबरोबर दिड वर्षांची असताना नदीमध्ये पोहण्यास सुरवात केली. अगदी खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये या चिमुकलीने भीमा नदीच्या पुराच्या पात्रात उडी मारत नदी पोहून पार करण्याचे धाडस दाखवले. आणि यात ती यशस्वी देखील ठरली आहे. रोशनी ने नदीचे अथांग पार करीत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Previous articleधक्कादायक-चार दारूड्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवावा म्हणून  पत्नीला  लोखंडी राँडने बेदम मारहाण,पतीसह चौघा मित्रांवर गुन्हा दाखल
Next articleअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मंचर पोलीसांनी कारवाई