धक्कादायक-चार दारूड्या मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवावा म्हणून  पत्नीला  लोखंडी राँडने बेदम मारहाण,पतीसह चौघा मित्रांवर गुन्हा दाखल

गणेश सातव, वाघोली-पुणे

घरच्यांचा विरोध डावलून अवघ्या ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहीतेस मद्यपी पतीने मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवायला सांगितले यांस नकार दिलेने पती व त्यांचे मित्रांनी तिला लोखंडी पाईप,पट्टा व हाताने मारहाण केली.यांवरून पतीसमवेत त्याचे चार मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            याप्रकरणी १९ वर्षीय पिडीत नवविवाहीतेने दिलेल्या फिर्यादी वरुन श्रीधर अशोक कदम ( रा. सहजपुर ता दौंड ),विशाल माने,तानाजी शिंदे,करण खडसे,विशाल माने ( पुर्ण नाव,पत्ता माहिती नाही ) यांचेविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत विवाहितेने घरच्यांच्या विरोधात जाऊन २२ जून रोजी आळंदी येथे प्रेम विवाह केला होता. त्यानंतर ते लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील एका गावात वास्तव्यास आहेत. पती एका कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणुन काम करायचा परंतू सध्या कोरोना मुळे तो गेलेे चार ते पाच महिण्यांपासून तो घरीच असतो

            पतीला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याचे मित्र सुरज कांबळे, तानाजी शिंदे, करण खडसे, विशाल माने हे दारू घेऊन यायचे व तिचे पतीबरोबर घरामध्ये दारू पित बसायचे. तिने त्यानां बरेच वेळा आमचे घरी येत जाऊ नका असे सांगितले. यांवरून पती तिला हाताने मारहाण करायचा. सोमवार ( १९ ऑक्टोबर ) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोघे घरी असताना माने व शिंदे घरी आले. येताना त्यांनी दारूच्या बाटल्या व मटन आणले होते. ती स्वयंपाक करायला लागली तोपर्यंत घराचे हॉल मध्ये ते सर्व दारू पित बसले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास सर्वांनी जेवण केले. ११ वाजण्याच्या सुमारास ती किचन मध्ये भांडी घासत असताना माने व शिंदे हे तेथे आले व तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तिने नकार दिल्याने पतीने तिच्या पायावर व हातावर लोखंडी पाईपने मारहान केली तर मित्रांनी हाताने मारहाण केली. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पतीने केसाला धरून ओढून पुन्हा मारहाण केली. त्यावेळी मित्रांनी तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरडा – ओरडा ऐकून शेजारी राहणारांनी त्यांना घरातून हाकलून दिले.

           त्याअगोदर १५ दिवसापुर्वी तिचे पतीचे मित्र सुरज कांबळे व करण खडसे हे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दारू घेवून आले होते. जेवण झाल्यानंतर दोन्ही मित्रांनी वरीलप्रमाणे प्रकार केला होता. त्यावेळीही नकार दिल्याने तिला सर्वांनी मारहाण केली होती. पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. पवार हे करत आहेत.

Previous articleहोय,आहे आमच्या मनात खंत खेड तालुक्यात राहूनही परप्रांतीय असल्याची-सुप्रियाताई साठे
Next articleअवघ्या साडे पाच वर्षांच्या रोशनी आव्हाळे या चिमुकलीने दुथडी भरलेल्या भीमा नदीला केले पार