घोडेगाव येथे किरकोळ कारणावरून लोहाराला शिवीगाळ

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दरेकरवस्ती येथे राहणारे लोहार समाजाचे दशरथ गणपत चव्हाण यांना किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यांनी या संदर्भात घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे

चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दशरथ चव्हाण लोहार काम करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात शनिवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते मारुती मंदिरासमोर जात असताना त्यांचा नातू शुभम व अक्षय यांच्यामध्ये बाचाबाची सुरू होती त्यावेळी ते अक्षय कसबे यास काय झाले असे विचारण्यासाठी गेले असता अक्षय कसबे यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली तसेच अक्षय ची आईनेही तेथे त्यांना शिवीगाळ दमदाटी करून तोंडात मारली भांडण वाढल्याने अक्षयने तिथे पडलेल्या एका दगड उचलून फिर्यादीचे कपाळावर मारला या संदर्भात दशरथ चव्हाण यांनी अक्षय उत्तम कसबे याचे विरोधात तक्रार केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleजवळे येथे ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleशिवसैनिकांच्या वतीने शिवसेनेचा वर्धापनदिन सामाजिक जाणिवेतून साजरा