मुसळधार पावसामुळे वाहून गेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह चासकमान धरणात सापडला

राजगुरूनगर : खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल सायंकाळी पाऊसाने थैमान घातले.या पाऊसाने खेड तालुक्यातील कहू कोयाळी येथे भोराबाई बुध्दाजी पारधी (वय ४३ ) आणि साहिल दिनेश पारधी वय ( ४ ) हे दोघे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .

चासकमान धरणात एनडीआरएफची टीम आली असून टिमला आज सकाळी चार वर्षांच्या चिमुकल्याचा मुतदेह धरणाच्या कडेला सापडला आहे.आजीचा मृतदेह शोधण्यासाठी परिसरात मोहीम सुरू करण्यात आली आहे.

कहू रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाखाली काल सायंकाळी जोरदार पाऊस आल्याने आजी व नातू आडोस्याला बसलेला असताना पाण्याचा लोंढा आल्याने त्या पाण्यात वाहून घेल्याचे सांगण्यात आले. काल सायंकाळी परिसरात अतिवृष्टी झाल्याने येथील ओढ्याला मोठा पूर आला होता

Previous articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन
Next articleलोणावळ्यात अवैध शस्त्र साठा जप्त,एकाला अटक