नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन, शिंदवणे,वळती गावात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी या गावांचा दौरा करुन नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक यांना शासकीय मदत त्वरित मिळवून देण्याचे वचन दिले. शिवसेना पक्षाच्या वतीने तात्पुरता दिलासा देण्यासाठी शेतकरी व नागरिकांना मदत करण्यात आली. उरुळी कांचन येथील नऊ मोरीच्या समस्ये बाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्फत रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून कायम स्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल याची ग्वाही नागरिकांना दिली.

या प्रसंगी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाप्रमुख काळुराम मेमाणे, तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, संजय कुंजीर, श्रध्दा कदम, रमेश भोसले, मच्छिंद्र सातव, छाया महाडिक, लाला तुपे, विजय बगाडे, श्रीकांत मेमाणे, सचिन कांचन, अतुल मोरे, संतोष कुंजीर, युवराज महाडिक, दादा कुलाळ शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.