ओला दुष्काळ जाहीर करावा – अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेची मागणी

नारायणगाव (किरण वाजगे)

नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे तसेच गेली चार महिने पडत असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांच्याकडे अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तसेच गेली दोन वर्षे सातत्याने निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे. यावर्षी झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी प्रमोद खांडगे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ दगडू भांबेरे,ओंकार काळे, तालुका उपाध्यक्ष राहुल जेजुरकर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष वाघ व शेतकरी उपस्थित होते.

Previous articleमांजरवाडी येथे कांदा चाळीतील कांदे चोरणाऱ्या चोरट्याला गावकऱ्यांनी पकडले तर दुसरा फरार
Next articleनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन