शिरोलीत एक लाख ४७ हजारांची जबरी चोरी

राजगुरूनगर-खेड तालुक्यातील शिरोली येथील सावंतवस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे एक लाख 47 हजार रुपयांची जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत दिपक किसन सावंत (रा.शिरोली. सावंतवस्ती) यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेली माहितीनुसार, (दि.२०) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने शिरोली येथील दिपक सावंत यांच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करून घरातील सामानाची उचका पाचक करून घरातील एक लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. तसेच सावंत वस्ती येथील जितेंद्र चंद्रकांत सावंत यांच्या घरातून 47 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरली आहे. या अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख 47 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या अज्ञात चोरट्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर भोसले करत आहेत.

Previous articleराजगुरुनगर वाचनालयाची दुर्मिळ पुस्तके  इंटरनेटवर
Next articleजनावरांस चरावयास दिलेल्या रानाचे पैसे न दिल्याने भावाने भावावर केला गोळीबार