शिरूर येथील अल्पवयीन दुचाकीचोर ताब्यात : खेड पोलिसांची कामगिरी

राजगुरुनगर : शिक्रापुर वाडा गावठाण (ता.शिरूर) येथून अल्पवयीन मुलाने चोरुन विक्री केलेल्या दुचाकी मोटरसायकलीचा तपास लावण्यात खेड पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले.

  याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनामास्क व नियमभंग करून मोटारसायकल चालविणाऱ्यांना समज देण्याच्या उद्देशाने राजगुरुनगर शहरात खेड पोलिसांकडून मोहीम राबविली जात आहे.

यादरम्यान गुरुवारी (दि. १५) शरद काशिनाथ नाईकरे ( वय २२, रा. कमान, ता.खेड) हा बिगर नंबरप्लेटची दुचाकी घेऊन वाडा रस्त्याने जात असताना त्याला पोलिसांनी हटकले. आणि गाडीची कागदपत्रे मागितली. त्यावेळी त्यांच्याकडे गाडीची कागदपत्रे नसल्याचे समजले. अधिक चौकशी केली असता संबंधित बिगर नंबरप्लेटची मोटारसायकल वाडा गावठान (ता.शिरूर) येथून सहा महिन्यांपूर्वी खरेदी केली असून तेव्हापासून कागदपत्रांची मागणी केली असतानाही कागदपत्रे मिळाली नाहीत अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. संबंधित मोटारसायकल वाडा गावठाण (ता.शिरूर)  येथील एका अल्पवयीन मुलाकडून तीस हजार रुपयांना विकत घेतल्याचे समजते. याकामी संबंधित अल्पवयीन मुलाच्या भावानेही दुचाकी चोरीमध्ये मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी खेड पोलिसांनी तातडीने हालचाल करून संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन व होंडा शाईन कंपनीच्या दुचाकीसह शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले. आणि संबंधित गुन्हा शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाण्यात वर्ग केला.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव, हवालदार संतोष मोरे, राजेश नलावडे, संजय नाडेकर, विजय सरजीने, शिवाजी बनकर, विकास पाटील, शेखर भोईर यांनी विशेष कामगिरी केली

Previous articleगावठी पिस्तुल व जिवंत काडतुससह सराईत गुन्हेगार जेरबंद
Next articleराजगुरुनगर वाचनालयाची दुर्मिळ पुस्तके  इंटरनेटवर