राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रशांत मदने यांची निवड

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी प्रशांत राजेंद्र मदने यांंची निवड करण्यात आली. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे , शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते मदने नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तुकाराम पवार, अर्जुन मदने, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष बाजीराव भालसिंग, माजी सरपंच बबन गायकवाड, माजी उपसरपंच दिलीप उंद्रे, माजी उपसरपंच विशाल मदने, कैलास गायकवाड आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तरुणांच्या पर्यंत पोचविण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे नूतन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत मदने यांनी सांगितले.