खेड तालुक्यातील पाडळी गावात कृषी कन्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Ad 1

राजगुरुनगर:   देशभरात कोरोना संसर्ग वाढत असताना शेतीचे कामे चालूच आहेत.अशा परिस्थितीतही जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे,बुद्रुक कराड यांच्या विद्यार्थिनी  वैष्णवी पाडवी व रसिका गोरे यांनी राजगुरुनगर दूध उत्पादन केंद्राचे माजी अध्यक्ष आणि पाडळी गावाचे प्रगतशील शेतकरी निवृत्ती बबन शिंदे यांच्या प्रतिसादाने शेतकऱ्यांना नर्सरी व्यवस्थापन मधमाशीपालन अशा विषयांवर मार्गदर्शन करून व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

यांसाठी जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे,बुद्रुक कराड चे प्राचार्य डॉ.बी.एस.जाधव कृषी समन्वयक दीपक भिलवडे प्राचार्य माळी यांचे मार्गदर्शन लाभले.