खाजगी फायनान्स कंपन्याच्या कर्जवसुलीला स्थगिती द्या-मंगेश फडके

दिनेश पवार,दौड

कोरोना सारख्या प्रादुर्भावामुळे गेली 7 महिन्यापासून सर्वसामान्य जनतेच्या हाताला काम नाही,रोजगार व्यवसाय ठप्प झाले आहेत, यातच अतिवृष्टी परिस्थिती मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.यातच फायनान्स कंपन्या शचे एजंट कर्जवसुली साठी तगादा लावत आहे,सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे ही कर्जवसुली मार्च 2021 पर्यँत थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य दारू बंदी समितीचे प्रदेशाध्यक्ष मंगेश फडके यांनी केली आहे.तसेच या निवेदनाच्या प्रति माहितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री बचूभाऊ कडू ,इत्यादीना पाठवण्यात आल्या आहेत

राज्यातील कोरोना व अतिवृष्टी मुळे सर्वजण आर्थिक संकटात आहेत यातच येणारे सण सुध्दा साजरे करण्याची परिस्थिती सर्वसामान्य जनतेची राहिली नाही त्यामुळे या कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्यावी अशी मागणी फडके यांनी केली आहे,मागणी मान्य न झाल्यास प्रशासन दारी भिक मागो आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले गेले आहे.

Previous articleअक्षता कान्हूरकर यांची दक्षता समिती सदस्यपदी नियुक्ती
Next article   पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वांढेकर यांच्या सन्मान