वाफगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ , एक लाख ७० हजारी जबरी चोरी चोरी

राजगुरूनगर-वाफगाव (ता. खेड) येथे एकाच मालकाच्या कापड दुकान व घरातील कपाटातून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह एक लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.याबाबत दुकान मालक अतुल सारालाल शहा यांनी खेड पोलिस ठाण्यात विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाफगाव येथे अतुल शहा यांचे अतुल ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान व अक्षय ट्रेडर्स नावाचे कापड दुकान शेजारी शेजारी आहे.व दुकानाच्या शेजारी पाठीमागे शहा कुटुंब राहायला आहे . (दि.२०) रोजी शहा कुटुंब घरात झोपले असताना रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहा यांच्या पत्नी ओरडल्याने ते सर्व जागे झाले.त्यावेळी कोणीतरी बाहेर पळून गेले असे त्यांनी सांगितले त्यावेळी शहा यांनी आपल्या मुलाला बरोबर घेऊन आजूबाजूला व बाहेर जाऊन पाहिजे असता कोणीही आढळून आले नाही.त्यावेळी ते घरात आले असता त्यांच्या घरातील कपाटातील सामानाची उचका पाचक झालेली दिसली. त्यावेळी त्यांनी आपल्या कपाटाची व दुकानांची पाहणी केली असता अक्षय ट्रेडर्स नावाचे कापड दुकानाचे गल्ल्याचे लॉक तोडून ५६,०००/- रुपये, पहिल्या मजल्यावरील बेडरुम मधील कपाटातील ४,९००/- रुपये, व ड्रावर मधील १,९,३०१/ किंमतीचे ३.८ तोळे वजनाचे सोन्याचे मणिमंगळसुत्र असा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला होता. याबाबत अतुल शहा यांनी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous articleलॉकडाऊन नंतर लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकरच
Next articleचाकण मार्केट यार्ड मध्ये चक्रेश्वर भुसार सोयाबीन खरेदी विक्री केंद्राचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्या शुभारंभ