निरगुडसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांची कोरोनावर मात

Ad 1

प्रमोद दांगट,निरगुडसर – येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांना आरोग्य सेवा बजावताना कोरोनाची लागण झाली होती.

1

त्यांना काही दिवसापूर्वी सर्दीचा त्रास व थकवा जाणवू लागल्याने त्यांची दोनवेळा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या . त्यांचा शारीरिक त्रास कमी न झाल्याने त्यांनी स्वतःहून पुन्हा चाचणी करून घेतली असता ती पाॅजिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी मंचर ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुक्यात उत्तमप्रकारे जनसेवा व जनजागृतीचे काम केले.

आपल्या जिवाची तमा न बाळगता लोकांची सेवा केल्यामुळे त्यांना तालुका कोविडयोद्धा, कोविडकवच आदी पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. अविश्रांत तत्पर व प्रामाणिक जनसेवा अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांची कोरोना बरोबरची झुंज यशस्वी ठरली असुन त्यांनी कोरोनावर मत केल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, आरोग्य सेवक, सेविका ,प्रा.आ.केंद्र निरगुडसर व सेवकवृंद यांनीही गावडे यांचे अभिनंदन केले आहे.

आशा गटप्रवर्तक गितल गावडे यांना मंचर उपजिल्हा रूग्णालयात आरोग्य सेविकेच्या हस्ते ” कोरोना किट ” देवून निरोप देण्यात आला. लोकांच्या कृपा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच, मी या कोविड संकटावर यशस्वी मात करू शकले अशी प्रतिक्रिया गितल गावडे यांनी व्यक्त केली. कोरोनामुक्त झालेल्या गितल गावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.