शिंदवणे – वळती परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने उरुळी कांचनच्या ओढ्यांना पूर

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिंदवणे येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने याचा फटका शिंदवणे घाटाच्या खाली असणाऱ्या उरुळी कांचनला बसला उरुळी कांचनमध्ये असणाऱ्या ओढ्यांना पूर आल्याने त्याचे पाणी थेट बाजार मैदानावरील दुकानांमध्ये घुसले आहे. तरी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने दुकानदार सावध झाले पण दुकानदाराच्या मध्ये घबराट निर्माण झाली होती. तसेच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सर्व नागरिकांना सावधनतेचा इछारा देण्यात आला होता.

ओढ्यालतच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही सांगितले होते. तसेच उरुळी कांचन ते जेजुरी मार्गे कोणी जाऊ नये असे सांगितले होते. या भागातील रस्त्यांवरुन पाण्याचे मोठे लोंढे वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. रविवारी मध्यरात्रीनंतर शिंदवणे येथे ढगफुटी होऊन मोठा पाऊस झाला. यानंतर येथील ओढ्यांना पूर येऊन सर्व परिसर जलमय होऊन उरुळी कांचन येथील बाजार मैदान पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. शेतकऱ्यांचे सर्वात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले

शिरुर – हवेली आमदार अशोक पवार यांनी तातडीने येऊन परस्थितीचा आढावा घेतला. या परिसराने कधीही अशी परिस्थिती अनुभवली नव्हती तरी प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे. वळती – शिंदवणे – उरुळी कांचन येथील अनेक तरुण वर्ग परस्थिती पाहून नागरिकांना आधार देण्यासाठी प्रयत्न करत होते.

Previous articleजयहिंद ग्रुपचे संस्थापक,शिक्षण महर्षी तात्यासाहेब गुंजाळ यांचे दुखद निधन
Next articleशिक्षण महर्षी … तात्यासाहेब गुंजाळ यांचे निधन