कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कनेरसर येथे साध्या पद्धतीने घटस्थापना

राजगुरूनगर-खेड तालुक्यातील कनेरसर  येथील यमाई मंदिरात विधिवत प्रथेप्रमाणे देवीच्या गाभाऱ्यात घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सावास सुरुवात झाली. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी सह सपत्नीक विधिवत व साध्या पध्दतीने घटस्थापना करण्यात आली.

 यावर्षी देवीचा सार्वजनिक नवरात्रोत्सव व गर्दी होणारे भजन कीर्तन, होमवहन, दिंडी, पालखी दीप प्रज्वलन व दांडिया, गरबा आदी कार्यक्रम यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ दिवस देवीची पारंपरिक पूजा आरती, नैवद्य, तसेच घटस्थापना आदी विधी साध्या पद्धतीने पुजारी, गुरव, परडीवाले यांच्या मोजक्या उपस्थितीत पार पाडण्यात येणार आहे. आज (दि. १७ ) सकाळी ९ वाजता देवीच्या गाभाऱ्यात विधिवत पुजा अर्चा होऊन धार्मिक वातावरणात घटस्थापना करण्यात आली  .

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले कनेरसर येथे यमाई माता मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी असल्यामुळे दरवर्षी नवरात्र महोत्सवात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नऊ दिवस मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सतत नऊ दिवस हरिनाम सप्ताहात राज्यातील नामवंत महाराजांची येथे कीर्तने होत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कनेरसर येथे साध्या पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतिश गुरव व शिवानी गुरुव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

यावेळी कनेरसरचे सरपंच संदिप दोंडकर, खेड पोलिस गुप्तवार्ता विभागाचे संदीप भापकर व पुजारी उपस्थित होते. करोनाच्या संकट काळात मंदिर बंद असल्याने किरकोळ व मोठे व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थ, पुजारी परडीवाले व भाविकांना मंदिर परिसरात किंवा देवीच्या जुन्या मंदिर परिसरात कोठेही देवीचे फोटो ठेवून गर्दी जमवू नये.नवरात्र काळात देवीचे दर्शन www.yamaidevi.com या संकेत स्थळावर भेट देऊन ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा.करोना विषाणूचे संकट रोखण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन भाविकांना पोलिस निरिक्षक सतिश गुरव यांनी यावेळी केले.

Previous articleलोणकरवाडी  येथील  अतिवृष्टीने फुटलेल्या तलावामुळे  पिकांचे मोठे नुकसान, जि.प अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली पहाणी
Next articleजयहिंद ग्रुपचे संस्थापक,शिक्षण महर्षी तात्यासाहेब गुंजाळ यांचे दुखद निधन