लोणकरवाडी  येथील  अतिवृष्टीने फुटलेल्या तलावामुळे  पिकांचे मोठे नुकसान, जि.प अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी केली पहाणी

राजगुरूनगर-  खेड तालुक्यातील दावडी  येथील लोणकरवाडी येथील पाझर तलाव अतिवृष्टी पावसामुळे फुटला आहे. दावडी गावातील लोणकारवाडी येथील इंदिरा पाझर तलाव अतिवृष्टी पावसामुळे फुटल्याने शेतजमीन मध्ये असणारी पिके व शेती मध्ये असणारी जमीन वाहून गेली आहे.जवळपास असणारी घरे यामध्ये पावसाच्या वादळातुन थोडक्यात बचावली आहे. मोठी जीवितहानी टळली जवळपास 10 ते 15 एकर जमिनीतील पिके माती वाहून गेली आहे. दावडी भागात पंधरा दिवसांत दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे.या पाझर तलावाची पाहणी करण्यासाठी साठी पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे,माजी जिल्हा परिषदच्या सदस्य वंदना सातपुते, शिवसेना अध्यक्ष संतोष सातपुते यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

या वेळी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. व पाझर तलावाची उंची, पाणलोट क्षेत्र, तलावाची रुंदी  या साठी मदत करू असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित संतोष लोणकर, प्रताप लोणकर, रामदास तिकांडे,‌ भिवाजी लोणकर, अजय लोणकर, दीपक लोणकर, शेतकरी उपस्थित होते.

Previous articleमाजी आमदार स्व.साहेबराव बुट्टे पाटील यांच्या पत्नी शैलजा बुट्टे पाटील यांचे निधन
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कनेरसर येथे साध्या पद्धतीने घटस्थापना