जेष्ठ नागरिक सेलचे काम कोतुकास्पद-खा.डाँ.अमोल कोल्हे

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता योग्य ती काळजी घेतली पाहिजे. तालुक्याच्या सर्वागीण विकास कामासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही कटिबद्ध आहोत. यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रलंबित असणारा प्रश्न लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सोडवला जाईल तरी सर्व सभासदांनी एकत्र येऊन दोन ते तीन पर्याय ठेवले पाहिजे यावर चर्चा करुन मार्ग काढला जाईल असे आश्वासन शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी दिले. सोरतापवाडी (ता.हवेली) याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हा अध्यक्ष सोनबा चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार कोल्हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, रा.कॉग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा बँकचे संचालक प्रकाश म्हस्के, तालुका अध्यक्ष दिलिप वाल्हेकर, ऋषीराज पवार, रामदास चौधरी, रंगनाथ चोरघे, रंगनाथ कड, राजाराम कांचन, माधव काळभोर, राजेंद्र खांदवे, अमित कांचन, अमित चौधरी, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब भोसले, तानाजी चौधरी, आप्पासाहेब काळभोर, सुभाष काळभोर, धनंजय साठे, सुभाष टिळेकर, संतोष कांचन, सनि चौधरी, जगदीश महाडिक, अनिल जगताप, रमेश मेमाणे, प्रभाकर कामठे, जिजाबा गोते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ कड यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक सोनबा चौधरी यांनी प्रास्ताविक केले.आमदार अशोक पवार म्हणाले की तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावत असताना खासदार डॉ अमोल कोल्हे यांची सातत्याने मदत होत असते.

Previous articleएकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleमाजी आमदार स्व.साहेबराव बुट्टे पाटील यांच्या पत्नी शैलजा बुट्टे पाटील यांचे निधन