आता एका क्लिकवर पाच हजार वस्तू मिळणार ‘घरपोच’ घटस्थापनेपासून होणार स्वदेशीचा जागर

 पुणे-भारतीय बनावटीच्या वस्तू आणि अत्यंत दर्जेदार अन वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ आता अवघ्या एका क्लिकवर तेही ‘घरपोच’ मिळणार आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘घरपोच कनेक्ट’ कंपनीची ग्राहकसेवा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर वझे यांनी दिली.

कोरोना या जागतिक महामारीमुळे देशभरातील अनेक व्यवसाय बंद पडले. यातून हजारोंचे रोजगार बुडाले. याचा थेट परिणाम साहजिकच अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्थानिक, स्वदेशी कंपन्यांना चालना मिळणे हाच आहे. नेमकी हीच गरज ओळखून युवकांना रोजगार मिळावा, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे आणि स्वदेशी खरेदीची संधी ग्राहकांना मिळावी या उदात्त हेतूने ‘घरपोच कनेक्ट’ ची सुरुवात झाल्याचे श्री. वझे म्हणाले.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘घरपोच कनेक्ट’ च्या शुभारंभ पूर्व विक्रीची सुरुवात होत आहे. शुक्रवारी (ता. १७) आणि शनिवारी (ता.१८) रोजी ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या मालाची मागणी एपद्वारे नोंदवू शकणार आहेत.

महाराष्ट्रभर विविध प्रांतात असलेले मसाले, पिठे, गोड पदार्थ, बेकरी उत्पादने, तळणीचे पदार्थ, चटण्या, लोणचे, जॅम, सुकामेवा, सरबते अशा ४०० उत्पादकांची पाच हजारांहून अधिक उत्पादने चोखंदळ ग्राहकांपर्यंत ‘घरपोच कनेक्ट’ एपच्या माध्यमातून पोहचणार आहेत, असे श्री. वझे यांनी सांगितले.

यासाठी राज्यभरात ५० वितरक आणि ५० जिल्हा संयोजक नेमण्यात आले आहेत. तर ग्राहकांपर्यंत विविध दर्जेदार खाद्यपदार्थ, वस्तू पोहचविण्यासाठी दर तीन हजार घरांमागे एक अशा तब्बल ७ हजार ५०० संवादकांची नियुक्ती राज्यभर करण्यात आल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर वझे म्हणाले.
——–
अरे वा ! घरपोच आणि सवलतही !!

‘घरपोच कनेक्ट’ चे आणखी एक वेगळेपण म्हणजे यातील अनेक वस्तू, खाद्यपदार्थांवर विशिष्ट सूट देण्यात आली आहे. त्यामुळे स्वदेशी वस्तू, पदार्थ घरपोच मिळण्याबरोबच त्या सवलतीच्या दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांचा तिहेरी फायदा होणार आहे.
———
काय आहेत ‘घरपोच कनेक्ट’ ची वैशिष्ट्ये ?

आजवर ५ लाखाहून अधिक एप डाउनलोड

स्वदेशी वस्तू, खाद्यपदार्थ मिळणार घरपोच

दर्जाची हमी

डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी फ्री होम डिलिव्हरी

विश्वासू संवादक साधणार ग्राहकांशी संवाद

स्वदेशी वस्तू खरेदीची ग्राहकांची इच्छा होणार पूर्ण

Previous articleनऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Next articleअवघ्या आठ महिन्याचा अल्प कालावधीमध्ये ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज ला मिळाला दुसरा पुरस्कार