नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथील पवारमळा येथे मोलमजुरी ची कामे करणाऱ्या माळी कुटुंबातील नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या उज्वला किसन माळी ( वय 32 )या महिलेचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिलेच्या पाठीमागे तीन लहान मुली असून घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत महिलेचा पती किसन संतोष माळी यांनी मंचर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार उज्‍वला माळी ९ महिन्याच्या गरोदर होत्या रविवार दिनांक ११ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची लहान मुलगी झोपेतून उठल्या मुळे तिला खायला देऊन त्या पुन्हा झोपण्यासाठी गेली असता तिला अचानक गुचकी लागली होती.त्यानंतर त्याची काही एक हालचाल होत नसल्याने व ती नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिला घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून ती मयत झाल्याचे सांगितले. सदर महिला गर्भवती असल्याने छातीवर दाब देऊन तिला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात सांगितले असल्याचे महिलेच्या कुटूंबियांनी सांगितले आहे. दरम्यान हे कुटुंब मोलमजुरी करून आपले कुटूंब चालवत होते. या महिलेच्या मागे तीन लहान मुली ,नवरा,असा परिवार असून या घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleघरगुती जाचाला कंटाळून तांबडेमळ्यातील एकाची आत्महत्या
Next articleआता एका क्लिकवर पाच हजार वस्तू मिळणार ‘घरपोच’ घटस्थापनेपासून होणार स्वदेशीचा जागर